Heart Attack | या ब्लड ग्रुपला हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका! | Sakal Media

2022-04-29 240

Heart Attack | या ब्लड ग्रुपला हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका! | Sakal Media

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरातील मृत्यूंमागे हृदय रोग हेही महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असेल तर तुम्हाला खास सावधानता बाळगली पाहिजे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालानुसार, ए आणि बी ब्लडग्रुप असणाऱ्या लोकांना ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ८ टक्क्यांनी जास्त आहे. या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी अमेरिकन संशोधिकांनी ४ लाखाहून अधिक लोकांच्या डेटावर तपास केला.
संशोधकांनी ए आणि बी ब्लड ग्रुपच्या लोकांची तुलना ओ ब्लड ग्रुपशी केली. त्यावेळी त्यांना बी ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांनाही हृदयविकाराचा धोका उद्भवतो, असं सांगण्यात आलंय.
ए ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना हृदयाचे ठोके थांबण्याचा सर्वाधिक धोका आहे. ओ च्या तुलनेत ए ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट फेल म्हणजेच हृदय बंद पडण्याचा धोका ११ टक्क्यांनी जास्त आहे. हार्ट फेल्युअर म्हणजेच हृदयाचे ठोके थांबणे किंवा हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका हे दोन्ही हृदयाशी संबंधित आजार आहेत. हृदयाचे ठोके थांबण्याचा आजार हळूहळू विकसित होतो तर हृदयविकाराचा झटका अचानक येतो.
त्यामुळे तुमचा ब्लड ग्रुपसुद्धा ए किंवा बी असेल तर आरोग्याची काळजी घ्या

Free Traffic Exchange

Videos similaires